Home राष्ट्रीय तूर्तास पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश जीएसटीमध्ये नाही

तूर्तास पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश जीएसटीमध्ये नाही

42

GST COUNSIL : पेट्रोलियम उत्पादने अर्थात पेट्रोल आणि डिझेलचा समावेश तूर्तास वस्तू आणि सेवाकराअंतर्गत (GST) न करण्याचा निर्णय वस्तू आणि सेवाकर परिषदेने घेतला आहे. या संदर्भात वस्तू आणि सेवा करविषयक परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली; परंतु अनेक सदस्य याबाबत सहमत नाहीत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

वस्तू आणि सेवाकर परिषदेची ४५ वी बैठक शुक्रवारी सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली लखनौमध्ये प्रत्यक्ष उपस्थितीत झाली़ यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निर्णयांची माहिती दिली.

कर्करोगावरील उपचारांसाठी वापरण्यात येणाºया औषधांवरील वस्तू आणि सेवाकर १२ टक्क्यांवरून कमी करून ५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. लहान मुलांसाठीच्या दोन प्रकारच्या औषधांवर जीएसटी माफ करण्यात आला आहे. कोविड उपचारांसाठी औषधांवरील जीएसटी (ॠरळ) ची सवलत येत्या ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. दिव्यांगांसाठीच्या वाहनांवरचा जीएसटी कमी करून ५ टक्के करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांना वस्तू आणि सेवाकराच्या कार्यकक्षेत आणण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा विरोध असून यासंदर्भातील राज्याची भूमिका आपण केंद्रीय अर्थमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे कळवली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.

दरम्यान, पेट्रोल, डिझेलचा समावेश वस्तू आणि सेवा करामध्ये करून त्यांचे दर कमी करण्याच्या भूमिकेला विरोध करून महाविकास आघाडी सरकारने आपण सामान्य माणसाच्या विरोधात आहोत, हेच दाखवून दिल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली आहे.