बाभुळगांव तालुक्यातील कापूस पिकाची बोंडं सडताहेत, मोठे नुकसान होण्याची भीती

यवतमाळ
यंदा सप्टेंबर महिना संपत आला असला तरी राज्यात पाऊसच कोसळतच आहे. त्यामुळे परतीचा पाऊस लांबणीवर पडला असून, त्याचा दणका अद्याप सुरूच आहे. राज्यात 24 ते 30 सप्टेंबर दरम्यान देखील पावसाच्या सरी बरसणार आहेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
बाभुळगांव (यवतमाळ) : विदर्भातील अनेक जिल्ह्यात ‘ब्रेक’ घेत दमदार येत असलेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव तालुक्यातील कापूस पिकाला  [ COTTON CROP ] मोठा धोका निर्माण झाला आहे.
मागील काही दिवसांत पावसाने तीन-तीन दिवसांचा ‘बे्रक’ घेत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सोयाबीनसह कापसाच्या पिकाचे नुकसान होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सातत्याने पाऊस पडत असून, सध्या पºहाटीची परिपक्व झालेली बोंड सडत आहे़ त्यामुळे त्यातील कापसाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या उन्हं पडण्याची अतिशय गरज निर्माण झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात बाभुळगांव, नेर, कळंब, दारव्हा, आर्णि आदी तालुक्यात कापसाचे अधिक उत्पादन घेतले जाते़ सध्या या भागातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील कापूस पीक हातातून जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाब्याच्या क्षेत्रांमुळे देशात पावसाचा कालावधी लांबला आहे. विदर्भासह मुंबई, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील 3 दिवस जोरदार वाºयांसह मुसळधार पाऊस असेल असा अंदाज अंदाज हवामान विभागाने [ IMD ] वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *