महादेवी त्रिशलाराणी नाटिकेने रसिकांची मने जिंकली

मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य
नागपूर : पुलक मंच परिवार, महावीर गृहनिर्माण सहकारी संस्था, अमरस्वरूप फाउंडेशन द्वारे पर्युषण महापर्वावर ‘महादेवी त्रिशलाराणी’ या नाटिकेने रसिकांची मने जिंकली.
   जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. अनेक वर्षानंतर नाटकाचा प्रयोग होत असल्याने रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. डॉ. रवींद्र भुसारी लिखित  ‘महादेवी त्रिशलाराणी’ नाटिकेत त्रिशलाराणीची भूमिका वैदेही सोईतकर, महावीरांचे पिता सिद्धार्थ राजाची भूमिका अविनाश वेखंडे, बाल महावीरांची भूमिका बाल कलाकार राम सागर राठी याने केली. पार्श्वसंगीत अनिल इंदाणे यांचे होते. प्रकाश व्यवस्था शांतीनाथ भांगे बाबा पदम, ध्वनि व्यवस्था आदिनाथ भांगे, बंडू पदम यांची होती. विशेष सहकार्य अमोल विजय कापसे यांनी केले.
    मंगलाचरण ऋषभ आगरकर, सुरश्री आगरकर, प्रकाश वाकेकर, गजल, विभास गहाणकर यांनी केले. मंगल उदबोधन हर्षा वेखंडे, गृहस्थाचार्य आगम रत्न पं. मनोहरराव आग्रेकर यांनी दिले. सचिन जैन यांची मुलाखत डॉ. रवींद्र भुसारी, सचिन कोठारी यांची मुलाखत प्रा. आदेश बरया यांनी घेतली. व्हायोलिन वादन सुमंतकुमार गहाणकर यांनी केले. भक्तिगीते ऋषभ आगरकर, सुरश्री आगरकर,  श्रेयांस मारवडकर, रागेश्री आगरकर, जिनांशी मेहता, प्रकाश वाकेकर, विभास गहाणकर यांनी सादर केली. दीप प्रज्वलन महेंद्रकुमार कटारिया, दिलीप शिवणकर, अनंतराव शिवणकर, धुलचंद जैन, बसंतीदेवी जैन, भरतेश नखाते, सरोज नखाते, निर्मल शाह, अनिल इंदाणे, आदिनाथ भांगे बंडू पदम, प्रकाश मारवडकर, डॉ. नरेंद्र भुसारी, शरद मचाले, कल्पना सावळकर यांनी केले.
याप्रसंगी डॉ. रवींद्र भुसारी, मनोज बंड यांनी मनोगत व्यक्त केले. पुलक मंच परिवारावर गीत सुनील आगरकर, रागेश्री आगरकर, सुरश्री आगरकर यांनी सादर केले. गीत रचना डॉ. रवींद्र भुसारी यांची होती. बच्चों की पाठशालामध्ये मंगलाचरण रिद्धि किशोर मेंढे हिने सादर केले. विशेष उदबोधन मयंक मनोज बंड यांनी दिले.
कार्यक्रमाचे संचालन स्वाति मिलिंद तुपकर, प्रणिता रितेश बोबडे यांनी केले. आभार शरद मचाले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *