कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मिळेल 50 हजारांची भरपाई, केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात उत्तर कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची भरपाई

राष्ट्रीय

नवी दिल्ली : प्रत्येक कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची भरपाई [ Corona Compensation] दिली जाईल. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीतून पीडितांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल, असे केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयात म्हटले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून कोरोनाशी संबंधित मृत्यूंवर भरपाईची रक्कम आणि प्रक्रियेची माहिती दिली.

कोरोनाच्या संसर्गामुळे मृत [ CORONA DEATH ] पावलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी दाखल करण्यात आली होती. नियमानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची भरपाई मिळते. मात्र, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या मोठी असल्याने केंद्र सरकारने ही नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. एवढी मोठी भरपाई दिल्यास सरकारचे मोठे नुकसान होईल, अशी बाजू सरकारने मांडली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या दबावानंतर [ PRESSURE BY SUPREME COURT OF INDIA ] एनडीआरएफने  [ 50 THOUSAND RUPEES BY NDRF ] म्हटले की, कोरोना महामारीमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची भरपाई दिली जाईल. यासाठी मृतांच्या कुटुंबीयांना जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात अर्ज करावा लागेल. लोकमत 18 ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *