महिला पोलिसांचे दररोजचे कामाचे तास कमी

राजधानी मुंबई

मुंबई : राज्यात महिला पोलिसांचे दररोजचे कामाचे तास कमी करुन ८ तासांची पाळी करण्यात आली आहे. महिला, आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

महिला कर्मचाºयांना [ WOMEN POLICE ] कौटुंबिक जबाबदाºयाही सांभाळाव्या लागतात. त्यामुळे त्यांना १२ तासांऐवजी ८ तासांची पाळी देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यानंतर या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.

दरम्यान, हा निर्णय २७५ शहरी आणि ४२७ ग्रामीण पोलिस ठाण्यांमधे लागू होणार असून,७०२ महिला कर्मचाºयांना लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *