चंद्रपूरमधील पारंपरिक जलाशय पुन्‍हा सुरू करण्‍यासाठी पुढाकार

पूर्व विदर्भ

चंद्रपूर : जिल्‍ह्यातील बहुतांश तलावांची स्‍थिती दयनीय झाली आहे. अशा तलावांचे सामाजिक बांधिलकीतून पुनरुज्‍जीवन करण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. अंबुजा सिमेंट फाऊंडेशन (सीएसआर शाखेने) आणि एटीई चंद्रा फाऊंडेशनच्‍या मदतीने दुष्‍काळग्रस्‍त चंद्रपूर जिल्‍हा व राजस्‍थानचा पाली जिल्‍हा येथे पारंपारिक जलाशय पुन्‍हा सुरू करण्‍यासाठी उपक्रम हाती घेतले आहेत. यामुळे तलावात पाण्‍याचा मोठा साठा उपलब्‍ध होईल आणि याचा फायदा वन्‍यजीवांसह परिसरातील नागरिकांना होणार आहे.
दोन्‍ही जिल्‍ह्यांच्‍या ५० गावांमधील समुदाय तलावांची साफसफाई केल्‍याने १६६ दशलक्ष लिटर अतिरिक्‍त पाणी साठा क्षमता निर्माण होण्‍याची खात्री मिळेल.
मे आणि जून २०२१ मध्‍ये जिल्‍ह्यातील ११ गावांमधील तलावांची साफसफाई केल्‍याने अतिरिक्‍त पाणीसाठा क्षमता निर्माण होणार आहे. पाचगाव, एकोडी, हिरापूर, लंबोरी, पुनागुंडा, टेकाअर्जुनी, कोरपना, मर्कलमेटा, पुडीयाल मोहाडा या नद्यांमधून २४,००० घनमीटर गाळ काढण्‍यात आला तर पालीमधून १,४२,००० घनमीटर गाळ काढण्‍यात आला, ज्‍यामध्‍ये ९ ग्रामपंचायतींमधील १७ तलावांमधील गाळ साफ करण्‍यात आला.
या प्रयत्‍नाला स्‍थानिक समुदायांनी उत्‍स्‍फूर्तपणे प्रतिसाद दिला, ज्‍याअंतर्गत साफसफाई करण्‍याची गरज असलेल्‍या जलाशयांची निवड ते संपूर्ण सुधारणा करण्‍याच्‍या प्रक्रियेवरील देखरेखीपर्यंत त्‍यांनी मदत केली. तसेच प्रकल्‍पाचा ७५ टक्‍के खर्च स्‍थानिक समुदायांनी केला असून काहीजणांनी तलावांची साफसफाई करण्‍यासाठी उत्‍खनन मशिन्‍स व ट्रॅक्‍टर्सचा पुरवठा केला आहे आणि विविध ग्रामीण विकास कार्यांसाठी आसपासच्‍या भागांमध्‍ये गाळ नेण्‍यात आला आहे.

अंबुजा फाऊंडेशनच्‍या [ AMBUJA FOUNDATION ] संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पर्ल तिवारी म्‍हणाल्‍या, ‘’एसीएफ नवोन्‍मेष्‍कारी दृष्टिकोनाचा अवलंब करते आणि समुदायांमध्‍ये पाण्‍याचे जतन करण्‍यासोबत पाण्‍याच्‍या पातळ्या वाढवण्‍यासाठी पारंपारिक ज्ञानाचा वापर करते. एटीई चंद्रा फाऊंडेशनसोबतचे आमचे कार्य शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नांवर अनेक अनुकूल परिणाम निर्माण करेल आणि भूजल पातळी वाढवण्‍याची देखील खात्री घेईल.’’
साफसफाई करण्‍याच्‍या प्रयत्‍नांमधून आसपासच्‍या भागांतील ५५० ट्युबवेल्‍समधील पाण्‍याच्‍या पातळ्या वाढल्‍या असल्‍या तरी काढण्‍यात आलेला गाळ मातीमधील ओलावा वाढवण्‍यामध्‍ये, तसेच पीकाची उत्‍पादकता वाढवण्‍यामध्‍ये अत्‍यंत लाभदायी असल्‍याचे मानले जाते.

२००० च्‍या सुरूवातीपासून एसीएफने दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये नवीन जलाशय निर्माण करण्‍याऐवजी अस्तित्त्वात असलेल्‍या जलाशयांची दुरूस्‍ती व देखरेखीला प्राधान्‍य दिले आहे. हा दृष्टिकोन आर्थिकदृष्‍ट्या लाभदायी आहे, कारण यामुळे नवीन जलाशय निर्माण होण्‍यासाठी लागणारा खर्च, तसेच जमिन व मजूरकामाची बचत होते. अशा निर्माणांच्‍या सातत्‍यपूर्ण देखरेखीमधून जलाशयांची साफसफाई करण्‍याची, तसेच लीकेजेस् दुरूस्‍त करण्‍याची काळजी घेतली जात असल्‍याचे अंबुजाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी नीरज अखौरी [ CEO NEERAJ AKHAURI ] यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *