500 दिवसांपेक्षा जास्त काळ शाळा बंद राहिल्याने 32 कोटींहून अधिक मुले प्रभावित

शिक्षण

SCHOOL AFTER CORONA : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने [ ICMR ]  एका अभ्यासाद्वारे शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने दृष्टिकोन स्वीकारण्यावर भर दिला आहे. दुसरीकडे युनेस्कोच्या अहवालानुसार, भारतात 500 दिवसांपेक्षा जास्त काळ शाळा बंद राहिल्याने 32 कोटींहून अधिक मुले प्रभावित झाली आहेत.

आयसीएमआरद्वारे प्रकाशित इंडियन जर्नल आॅफ मेडिकल रिसर्चचे लेखक आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव, समीर पांडा आणि तनू आनंद यांनी केलेल्या अभ्यासानुसार, कोरोना महामारीच्या काळात दीर्घकाळ शाळा बंद राहिल्याने प्रभावित झालेल्या मुलांचा विकास समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा उघडल्या पाहिजेत (माध्यमिक शाळेनंतर प्राथमिक शाळा). योग्य खबरदारी आणि अनिवार्य सूचनांसह शाळा उघडल्या पाहिजेत.

देशातील 15 राज्यांमधील 1 हजार 362 घरांवर केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की गावांमध्ये राहत असलेले फक्त 8 टक्के मुले आणि शहरी भागातील 24 टक्के मुले नियमितपणे शिक्षण घेत आहेत. हे सर्वेक्षण दुर्बल घटकातील मुलांसंदर्भात करण्यात आले. याशिवाय 75 टक्के पालकांनी मुलांच्या वाचन क्षमतेवर विपरित परिणाम झाल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील गुणवत्ता यादीतील सर्व उमेदवारांचेअभिनंदन

दरम्यान, देशात सध्या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची चाचणी अद्याप भारतात सुरू आहे. सध्याच्या पुराव्यांनुसार, 12 आणि त्यावरील वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असल्याने त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. आयसीएमआरने केलेल्या अभ्यासात, सर्व शालेय कर्मचारी आणि मुलांचे मास्क वापरण्यावर, स्वच्छतेच्या प्रोटोकॉलसह सर्व आवश्यक कोरोना नियमांचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *