Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य HAPPY BIRTHDAY… लतादिदींनी ‘या ’ नावाने केले संगीतकार म्हणून काम

HAPPY BIRTHDAY… लतादिदींनी ‘या ’ नावाने केले संगीतकार म्हणून काम

82

लता मंगेशकर…भारताच्या गानकोकिळा…भारतातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ मिळवणाºया दुसºया गायिका आहेत. त्यांच्या अजरामर गाण्यांनी जवळपास सात दशके रसिकांना भुरळ घातली आहे. त्यांच्या नावाची दखल गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही घेतली गेली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारानेही लतादीदींना गौरवण्यात आले आहे. आजवर २० भारतीय भाषांत त्यांनी गाणी गायली आहेत. केवळ भारत नव्हे तर जगभरातील रसिकांवर त्यांची मोहिनी आहे.

१९६० च्या दशकात लता मंगेशकर [ LATA MANGESHKAR ] निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. या काळात लता दिदींनी जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी अनेक गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या…’ हे ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे ‘अजीब दास्ताँ है…’ ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (१९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले. १९६१ मध्ये दिदींनी सचिन देव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी ‘अल्ला तेरो नाम…’हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.

इ.स. १९६२ मध्ये लता मंगेशकर यांनी ‘बीस साल बाद’ चित्रपटातील ‘कहीं दीप जले कहीं दिल…’ या हेमंत कुमार मुखोपाध्याय-दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बांगला भाषेतली गाणीही म्हटली आहेत.
२७ जून १९६३ रोजी भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लता दिदींनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र्र यांनी संगीतबद्ध केलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों…’ हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. यावेळी दिदींच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाºया जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले होते.
इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांच्याबरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर ‘गाईड’ (१९६५) मधील आज फिर जिनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्वेल थीफ
(१९६७) मधील ‘होठों पे ऐसी बात…’ यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी गायिली.

लता मंगेशकर यांनी संगीतकार मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी गायिली. यात ‘अनपढ’ ( १९६२) चे ‘आपकी नजरोंने समझा, वो कौन थी (१९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया ( १९६६) चे तू जहां जहां चलेगा…या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

लक्ष्मीकांत प्यारेलाल या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लता मंगेशकर यांनीच गायिली आहेत. या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही. १९६३ मधील ‘पारसमणी’ या लक्ष्मी-प्यारे जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातील लतादिदींची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. दिदींनी मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडके या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले.

२७ जून १९६३ रोजी भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लतादिदींनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों…’ हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाºया जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. लतादीदीने मराठीत अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करावा लागेल.

लतादिदींनी स्वत: ‘आनंदघन’ अशा नावाने संगीतकार म्हणून मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत.

– माळ्याच्या मळ्यामंधी…
– ऐरणीच्या देवा तुला…
– राजाच्या रंगम्हाली …
– नको देवराया अंत आता …
– अखेरचा हा तुला दंडवत …
– बाई बाई मन मोराचा …
– शूर आम्ही सरदार …
– निळ्या आभाळी …
– नाव सांग सांग …
– झाला साखरपुडा …

सर्वाेच्च पुरस्कार
– पद्मभूषण : 1969
– दादासाहेब फाळके अवार्ड :1989
– पद्म विभूषण : 1999
– भारतरत्न : 2001
याशिवाय महाराष्ट्र राज्यासह देशातील अनेक राज्य सरकारांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

लतादिदींनी आज 28 सप्टेंबर 2021 रोजी 92 वर्षे पूर्ण केलीत़ त्यांना उदंड आयुष्य लाभो, ‘ अभिवृत्त’ कडून कामना !

Created and Edited by Shilpa Mundalkar