पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा पोटनिवडणूक 30 सप्टेंबरला़

राष्ट्रीय

BHAVANIPUR BYEPOLL: मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची बनलेली पश्चिम बंगालमधील बहुचर्चित भवानीपूर विधानसभा पोटनिवडणूक [ BHAVANIPUR BYEPOLL ] उद्या, 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. सोमवार संध्याकाळी या जागेवरील निवडणूक प्रचार संपुष्टात आला.

बस्स, इथंच हसता येईल … तिकीट चेकरला माझे खरे…

भवानीपूर पोटनिवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी पूर्ण जोर लावला आहे. ममता बॅनर्जींचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या 80 नेत्यांना मैदानात उतरवले होते. मागील निवडणुकीत ममता यांनी आपल्याच माजी सहकाºयाविरोधात जोरदार टक्कर दिली होती; परंतु त्यांचा पराभव झाला़ आता भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात प्रियांका तिब्रेवाल [ PRIYANKA TIBREWAL ] यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा कोणत्याही प्रकारे जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

आंध्र प्रदेशात 1.63 लाख एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात टीएमसीने आपले कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांनाही प्रचारात उतरवले होते. ममता बॅनर्जी [ MAMTA BANARJI ] यांचे पुतणे आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून मोठ्या आघाडीने विजयी होतील, असा दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *