Home राजधानी मुंबई खासदार भावना गवळींना ईडीकडून समन्स,हजर राहण्याचे आदेश

खासदार भावना गवळींना ईडीकडून समन्स,हजर राहण्याचे आदेश

15

मुंबई, 29 सप्टेंबर : शिवसेना खासदार भावना गवळी ( Bhavana Gawali) यांच्या कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक झाल्यावर आता भावना गवळींना ईडीकडून समन्स आले आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अमरावतीच्या सिटी बँकेत अनियमितता  झाल्याच्या आरोपावरून ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी धाड टाकली. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची दाट शक्यता होती. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.