STAND ALONE PHOTO : मिस युनिव्हर्स टूरिझम श्रिया परब घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

STAND ALONE PHOTO

मुंबई :  मिस युनिव्हर्स टूरिझम आणि मिस एशिया विजेत्या श्रिया परबने [ Shriya Parab ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. [ Shriya Parab Miss Tourism Universe Asia 2021 winner]

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आमदार सुनिल प्रभू, शिवानी परब, संजय परब, आदित्य परब, ऋषिकेश मिराजकर उपस्थित होते. श्रियाने राज्याच्या पर्यटन विकासासाठी शासनाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

लेबनान येथे पार पडलेल्या मिस युनिव्हर्स टूरिझम 2021 स्पर्धेत सिंधुदुर्गमधील मालवण कन्या श्रिया परब  विजेती ठरली. आशियामधील 22 देशांच्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तिने देशाचं प्रतिनिधित्व केले. मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया 2021 हा किताब पटकावून श्रियाने सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *