सौंदर्यासह दमदार अभिनयाची तापसी…

रानशिवार

सोशल मीडियावर आपली स्पष्ट मते मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तापसी पन्नू [ BEAUTIFUL TAPASI PANNU ] हिने आजवर चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या आहेत. मॉडेलिंगपासून करिअर सुरू करणारी तापसी दक्षिणेतील चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

1 आॅगस्ट 1987 रोजी तापसीचा दिल्लीत जन्म झाला. तिचे वडील बांधकाम व्यावसायिक होते, तर आई गृहिणी आहे. तापसीने दिल्लीत संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. मॉडेलिंगमध्ये नशिब अजमावून तिने काही सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेतला होता. फेमिना मिस इंडियाची ती ‘बेस्ट स्किन’ या टायटलची मानकरी ठरली होती. यानंतर तिने अभिनयाकडे वाटचाल सुरू केली.

तापसीने आपल्या अभिनयाने लाखो चाहते निर्माण केले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटात तिने रवि तेजा, पवन कल्याण, गोपीचंद, कार्ती, विजय आदींसोबत अभिनय साकारला आहे. हिंदीतही अमिताभ बच्चन यांच्यासोबत पिंक, मुलुख, मिशन मंगळ (अक्षय कुमार)अशा अनेक चित्रपटांतून तिने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.

येत्या महिनाभरत तिचे सरदार उधमसिंग, शिद्दत, धाकड,रावण लीला असे काही चित्रपट पडद्यावर येत आहेत.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *