महात्मा गांधी जगासाठी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक : राज्यपाल

विदर्भ

वर्धा : महात्मा गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक राहिले आहेत. सेवाग्राम आश्रम हे प्रेरणास्थान आहे. आश्रमातील स्मारके जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे असे नियोजन करावे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देत बापुकुटीत प्रार्थना करून गांधीजींना अभिवादन केले. [ GOVERNER KOSHYARI IN BAPU KUTI ]

MOVIE NEWS : सौंदर्यासह दमदार अभिनयाची तापसी…

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, महात्मा गांधी यांनी आदर्श आणि त्यागमय जीवन जगून जगातील हजारो लोकांना प्रेरित केले. शिवाय आजही गांधींचे विचार जगाला प्रेरित करत आहे. आज महात्मा गांधींची जयंतीदिनी सेवाग्राम इथे येऊन मी स्वतःला धन्य मानत असल्याचे सांगितले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे गांधी आश्रमात आगमन होताच खासदार रामदास तडस यांनी त्यांचे स्वागत केले. तर आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी स्वागत केले.

MARATHI JOCKS FOR YOU : बस्स, इथंच हसता येईल … तिकीट चेकरला माझे खरे…

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रशासनाच्या वतीने राज्यपालांचे स्वागत केले. आ. पंकज भोयर, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोडपे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, मिलिंद भेंडे, अविनाश देव आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *