Home राजधानी मुंबई नट्टू काका अर्थात घनश्याम नायक यांचे निधन

नट्टू काका अर्थात घनश्याम नायक यांचे निधन

44

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील नट्टू काका अर्थात घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी ट्विट करत निधनाची बातमी दिली आहे.

माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून घनश्याम नायक [ Ghanshyam Nayak Death ] यांची प्रकृती बिघडली होती. अखेर उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कर्करोगावरील (कॅन्सर) उपचार सुरू होते. मात्र, दिवसेंदिवस प्रकृती बिघडत गेल्याने अखेर त्यांनी रविवारी अंतिम श्वास घेतला. मृत्यूसमयी त्यांचे वय 77 वर्षे होते.