काठीला त्याने पाय बनवला आणि चालतोचि वाट…

रानशिवार

ABHIVRTTA POSITIVE : चांगली धडधाकट आणि हातपाय शाबूत असलेली माणसं कोणतेही काम करत नाहीत. हातपाय गाळून बसतात आणि नशिबाला दोष देत असतात; परंतु एक तरुण मात्र उजवा पाय कंबरेपासून नसूनही आपल्या कामात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळतो.

सदर तरुण आपल्या सायकलवरून घरगुती सिलेंडर वाहून नेत असल्याचे पाहावयास मिळते. एकतर त्याने दुकानातून सिलेंडर आणला असावा किंवा भरून आणण्यासाठी जात असावा़ एकूणच सदरचा व्हिडिओ पाहता तो ग्रामीण भागातील असल्याचे दिसून येते. दुचाकीवरून जाणाºया इसमाने हा व्हिडिओ तयार केला आहे.

सोबतचा हा तरुण अगदी सफाईदारपणे आपल्या उजव्या पायाऐवजी काठीचा वापर करत आहे. त्याला कं बरेपासून पाय नाही़ तरीही तो कुठे थांबला नाही़ काठीचा का होईना त्याना आधार मिळाला आहे आणि तो वाट चालत आहे. (रमेश घोलप आयएएस यांच्या ट्विटरवरून साभार )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *