Home राष्ट्रीय देशभरात फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप अचानक ठप्प 

देशभरात फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप अचानक ठप्प 

34

नवी दिल्ली : देशभरात सोमवारी रात्री साडेआठनंतर सोशल मीडियावरील फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप ही तिन्ही प्लॅटफॉर्मस् अचानक ठप्प पडली. सोमवारी मध्यरात्रीनंतर 1.15 वाजता ही स्थिती कायम होती. [ people are having trouble accessing whats app, facebook, insagram ]

देशात फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद पडल्याने अनेकांना अडचणी आल्या. यामागील कारण अधिकृतरित्या अद्याप सांगण्यात आलेले नाही़ मात्र, लाखो यूजर्स अक्षरश: वैतागल्याची स्थिती दिसून आली.

वैयक्तिक आणि कार्यालयातील कामांसाठी या प्लॅटफॉर्मस्चा मोठा वापर केला जातो. मात्र गेल्या काही तासांपासून अचानक या सेवा ठप्प झाल्याने कामांमध्ये अडचणी येत आहेत.