Home राजधानी मुंबई आर्यनचा आपले वडिल शाहरूख खानबद्दल अतिशय धक्कादायक खुलासा

आर्यनचा आपले वडिल शाहरूख खानबद्दल अतिशय धक्कादायक खुलासा

145

मुंबई : ड्रगप्रकरणात अटकेत असलेला आर्यन खान याने आपले वडिल शाहरूख खानबद्दल अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे़ आपल्या वडिलांना भेटण्यासाठी मँनेजरकडून अपॉर्इंटमेंट घ्यावी लागते, अशी माहिती एनसीबीच्या तपास पथकाला दिली आहे. टीव्ही 9 ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

शाहरूख खान याचा मोठा मुलगा आर्यन आता एनसीबीच्या ताब्यात असून, या प्रकरणात दोनवेळा सुनावणी झाली आहे. 4 आॅक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत मोठे खुलासे झाले आहेत. तसेच, आर्यनच्या फोनमध्ये आक्षेपार्ह गोष्टी आढळल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आर्यन खानचा खटला [ Aryan Khan Drug Case ] वकील सतीश मानेशिंदे लढत आहेत.