Home राजधानी मुंबई राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

42
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे ५० वे वार्षिक अधिवेशन

मुंबई : महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम  आहे. मात्र विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्त्वाचा आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार जयंत आजगावकर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, संस्थेचे विजय वैद्य,प्रा.बी.आर.शर्मा उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, तंत्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे. आज तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी आपल्याला निसर्गातून अनेक गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. आपल्याकडे तंत्रज्ञानातील अनेक विद्वान लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या राज्याला नक्कीच पुढे नेवूया. राज्यात नव्याने होणारे कला विद्यापीठ ही काळाची गरज आहे. आगामी काळातील कला विद्यापीठ राज्याच्या विकासात नक्कीच भर घालणारे आहे, असे मतही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.

आर्यनचा आपले वडिल शाहरूख खानबद्दल अतिशय धक्कादायक खुलासा

मुख्यमंत्री म्हणाले, जैव विविधतेचे जतन, संवर्धन आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या पिकांपासून आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करायला  पाहिजे. त्यासाठी आपल्याला या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. आपल्या देशातही ज्ञानवंत आहेत. त्यांनाही योग्य अशा गोष्टी उपलब्ध करून द्याव्या लागतील. तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयएसटीईचे नेतृत्व कोल्हापुराकडे आहे. ज्या भूमीत छत्रपती शाहू महाराजांनी समानता, सक्षमतेचा आणि शिक्षणाचा पाया रचला,त्या भूमीकडे हे नेतृत्व आहे, ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.