राज्यात संगीत व कला विद्यापीठ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

राजधानी मुंबई

MUMBAI CAPITAL : महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे. राज्यात जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे कला विद्यापीठ म्हणून येत्या काही महिन्यातच नावारूपास येणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत [ MINISTER UDAYAY SAMANT ] म्हणाले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात उदय सामंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार जयंत आजगावकर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, संस्थेचे विजय वैद्य,प्रा.बी.आर.शर्मा उपस्थित होते.

राज्यात शासकीय संगीत महाविद्यालय उभे राहत आहे ही राज्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तसेच राज्यात राबविण्यात येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाचा पहिला भागही आगामी मंत्रीमंडळासमोर सादर होणार आहे, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

आदर्शवत नवीन शैक्षणिक धोरण राज्य राबवेल : सतेज पाटील

राज्यमंत्री गृह (शहरे) सतेज पाटील म्हणाले, देशातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था, नवी दिल्ली ही संस्था कार्यरत आहे. विशेषतः संस्थेचे अध्यक्ष प्रताप देसाई हे शिक्षणाचा दर्जा जपला जावा यासाठी अत्यंत चांगलं काम करीत आहेत. सरकार बरोबर योग्यपणे समन्वय ठेवून शिक्षण क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. राज्यातही नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात एक आदर्श असे हे नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्र राबवेल, अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *