Home राजधानी मुंबई पुढील चार दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

पुढील चार दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

67
file photo

मुंबई : पुढील चार दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शेतकºयांची मात्र चिंता वाढली आहे.

दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.