नवरात्र उत्सव नऊ रंगांसंगे, पाठवा आपले छायाचित्र

उपराजधानी नागपूर

नागपूर : येत्या गुरुवारपासून शक्ती पूजनाच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असून, समस्त महिलांना हा उत्सव ‘अभिवृत्त पोर्टल’ सोबत साजरा करता येणार आहे.

आपल्या संबंधित दिवसाच्या रंगांसंगे साडी, लुगडे वा सलवार सूटमधील वैयक्तिक वा सामूहिक छायाचित्र पाठवता येईल. ते ‘अभिवृत्त पोर्टल’ वर प्रकाशित केले जाईल.

यात रंग पुढीलप्रमाणे आहे. 7 आॅक्टोबर पिवळा, 8 आॅक्टोबर हिरवा, 9 आॅक्टोबर राखडी (ग्रे),10 आॅक्टोबर नारंगी,11 आॅक्टोबर पांढरा,12 आॅक्टोबर लाल, 13 आॅक्टोबर निळा,14 आॅक्टोबर गुलाबी आणि 15 आॅक्टोबर पांढरा़

दरम्यान, ज्या दिवशीच्या रंगाचे छायाचित्र त्याच दिवशी प्रकाशित करण्यात येतील.
आपले छायाचित्र दुपारी 2 वाजेपर्यंत sewashraygrameen@gmail.com या ई मेल आयडीवर पाठवणे अपेक्षित आहे. छायाचित्रासह स्वत:सह गावाचे नाव, मोबाईल क्रमांक पाठवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *