प्राथमिकतेचे नियोजन : संत राजिन्दरसिंहजी महाराज

ललित ...शब्दलालित्य

भले आपण व्यापार क्षेत्राशी जोडलेले असू वा शिक्षण क्षेत्राशी, चिकित्सा तथा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी  जोडलेले असूवा आपला परिवाराचे पालन-पोषण करीत  असू वेळो-वेळी आपण आपल्या ध्येयाचे परीक्षण केले पाहिजे. जेणे करून आपल्याला माहित होईल आपण त्या पासून किती दूर आहोत?

स्वतःला विचारा की आपण कोठे लक्ष देत आहोतकिंवा आपली प्राथमिकता काय  आहेत ? आपल्यासाठी सहाय्यक होऊ शकते.  जर आपण अशा प्रकारे नियोजन केले तर आपल्याला असे दिसून येईल की आपण आपल्या स्वतःला, परीवाराला आणि अध्यात्मिक विकासासाठी खूप कमी  वेळ देतो.

जसे की आपण आर्थिक नियोजनावर भरपूर लक्ष आणि वेळ खर्च करत असतो. ज्यामुळे आपण हजारो सुर्योदय आणि सूर्यास्तशेकडो इंद्रधनुष्यसुंदर रंगीत झाडे, खुप सुंदर निळे आकाश आणि रस्त्याने जाणाऱ्या माणसाचे  हसरे चेहऱ्याकडे आपले दुर्लक्ष होते. प्रत्याक्षात  आपण आपल्या जीवनातील सुंदरतेला  विनाकारण गमावून बसतो. 

आपल्यापैकी किती माणसे या परिस्थिती मध्ये आहेत, जे आपल्या दैनंदिन जीवनात पैसा आणि धन-संपत्ती प्राप्त करण्या करिता इतके मग्न होऊन जातात की ते आपल्या जीवनातील इतर गोष्टींना विसरून जातात. अशा  करण्याने आपण केवळ नैसर्गिक सुंदरता आणि इतर लोकांच्या संबंधाच्या आनंदाला नजरे आड करतो. परंतु आपण आपला सर्वात मोठा खजिना जो अध्यात्मिक  दौलतीला   गमावतो आहोत.  तसेच पैसा कमविणे काही वाईट नाही.  परंतु   पैसा कमविताना आपला स्वार्थ, आपला परिवार अथवा अध्यात्मिक विकासाकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा आपण असे जीवन जगतो ज्यात आपण कोणत्याही बाबतीत संपन्न होऊ  शकत नाही.

जगात राहत असताना सुद्धा आपण आपल्या जबाबदारीवर लक्ष दिले पाहिजे तसेच  उत्तम प्रकारे आध्यात्मिक विकासाकडे पाऊल टाकले पाहिजे.  जर आपण विचार केल्यास कळून येईल कि अध्यात्मिकतेकडे लक्ष ठेवून आपण पूर्ण वेळ ध्यान-अभ्यासामध्ये खर्च करणे हा आपला विचार चुकीचा आहे. प्राथमिकतेची  योजना बनवताना काही वेळ दररोज आपण ध्यान-अभ्यासासाठी द्यायला पाहिजे, काही वेळ निष्काम सेवाकाही वेळ आपल्या परिवारासाठी आणि काही वेळ आपल्या कामासाठी सुद्धा दिला पाहिजे. असे केल्याने आपण  या सर्व क्षेत्रांमध्ये निपुण होऊ आणि आपल्या जीवनातील सर्व ध्येयांना यांच जीवनात प्राप्त करू शकू. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *