Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य ‘ससुराल सिमर का २’चे कलाकार तान्‍या शर्मा व करण शर्मा यांचे नागपूरकरांनी...

‘ससुराल सिमर का २’चे कलाकार तान्‍या शर्मा व करण शर्मा यांचे नागपूरकरांनी केले स्‍वागत

23
team of sasural simar ka 2 in nagpur

नागपूर : कलर्सवरील मालिका ‘ससुराल सिमर का २’ला रोमांचक कथानक आणि पात्रांच्‍या अद्वितीय अभिनयासाठी प्रेक्षकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद व प्रेम मिळत आले आहे. आगामी एपिसोडमध्‍ये रीमा (तान्‍या शर्माने साकारलेली भूमिका) आणि विवान (करण शर्माने साकारलेली भूमिका) यांच्‍या नात्‍याला तडा जातो, जेथे विवानला रीमाचा त्‍याच्‍यासोबत विवाह होण्‍यामागील खरे कारण समजते. ड्रामा पुढे सरकताच प्रेक्षकांना मालिकेमध्‍ये अनेक ट्विस्‍ट्स पाहायला मिळतील.

मालिकेचे कलाकार तान्‍या व करण यांनी नुकतेच त्‍यांच्‍या मालिकेबाबत चर्चा करण्‍यासाठी आणि प्रेक्षकांना कलर्सवरील आगामी पहिलाच व्हिज्‍युअल-क्विझ शो बायजू’ज प्रस्‍तुत ‘दि बिग पिक्‍चर’ची ओळख करून देण्‍यासाठी ऑरेंज सिटी नागपूरला भेट दिली. या नवीन शोचा होस्‍ट बॉलिवुडचा सुपरस्‍टार रणवीर सिंग आहे. या अनोख्‍या क्विझ शोबाबत उत्‍साह निर्माण करण्‍यासाठी आणि जीवनातील ख-या उत्‍साहाचा आनंद घेण्‍यासाठी तान्‍या व करणने शहरातील सर्वात प्रतिष्ठित स्‍मारक प्रख्‍यात दिक्षाभूमीला भेट दिली. शहरामध्‍ये असताना त्‍यांनी मालिका ‘ससुराल सिमर का २’ बाबत, तसेच आगामी आठवड्यांमध्‍ये प्रेक्षकांना पाहायला मिळणा-या अनेक ट्विस्‍ट्सबाबत देखील सांगितले.

शहराला भेट देण्‍याच्‍या अनुभवाबाबत सांगताना तान्‍या शर्मा म्‍हणाली, ‘’मला आज माझी मालिका ‘ससुराल सिमर का २’बाबत चर्चा करण्‍यासाठी नागपूरमध्‍ये आल्‍याचा आनंद होत आहे. मी मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करण्‍यासाठी, तसेच सतत पाठिंबा देण्‍यासाठी सर्वांचे आभार मानते. कलर्स होस्‍ट म्‍हणून सुपरस्‍टार रणवीर सिंग असलेला पहिला व्हिज्‍युअल आधारित क्विझ शो ‘दि बिग पिक्‍चर’ सादर करत असताना आमची इच्‍छा आहे की, आमचे सर्व चाहते व शुभचिंतकांनी हा शो पाहण्‍याचा आनंद घ्‍यावा.’’ विवान ओस्‍वालची भूमिका साकारणारा करण शर्मा म्‍हणाला, ‘’मी रणवीर सिंगचा मोठा चाहता आहे आणि सुपरस्‍टार आता टेलिव्हिजनवर पदार्पण करत असण्‍यासारखी दुसरी उत्तम बाब कोणतीच असू शकत नाही. ‘दि बिग पिक्‍चर’ हा अद्वितीय क्विझ शो आहे, जो लाखो भारतीयांना त्‍यांची स्‍वप्‍ने साकारण्‍यास मदत करेल.’’

अधिक जाणून घेण्‍यासाठी पाहा ‘सुसराल सिमर का २’ दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता आणि तुमची तकदीर आजमावण्‍यास सज्‍ज राहा, कारण सुरू होत आहे ‘दि बिग पिक्‍चर’ १६ ऑक्‍टोबर २०२१ पासून रात्री ८ वाजता दर शनिवार व रविवार फक्‍त कलर्स, वूट व जिओ टीव्‍हीवर.