वेस्‍टर्न डिजिटलकडून मॅक व पीसी युजर्ससाठी खिशाच्‍या आकाराएवढे डब्‍ल्‍यूडी एलीमेण्‍ट्स™ एसई एक्‍सटर्नल एसएसडी सादर

रोजगार

MUMBAI :  वेस्‍टर्न डिजिटलने (NASDAQ: WDC) आज डब्‍ल्‍यूडी एलीमेण्‍ट्स™ एसई एसएसडी (WD Elements™ SE SSD)च्‍या सादरीकरणाची घोषणा केली. हे नवीन पोर्टेबल स्‍टोरेज सोल्‍यूशन कार्यक्षम असण्‍यासोबत त्‍याची डिझाइन खिशाच्‍या आकाराएवढी आहे. हा सुसंगत डिवाईस त्‍वरित फाइल्‍स हस्‍तांतर करण्‍यासाठी पोर्टेबल ड्राइव्‍हची गरज असलेल्‍या ग्राहकांसाठी उत्तम सोल्‍यूशन आहे. डब्‍ल्‍यूडी एलीमेण्‍ट्स एसई एसएसडीसह ग्राहक काम करत असो किंवा धमाल मनोरंजनासाठी कन्‍टेन्‍टची निर्मिती करत असो लॅपटॉप्‍स, डेस्‍कटॉप्‍स आणि इतर डिवाईसेसमधील त्‍यांच्‍या कंटेन्‍टवर नियंत्रण ठेवू शकतात.

डब्‍ल्‍यूडी एसएसडी पोर्टफोलिओमधील या नवीन डिवाईसच्‍या लाँचबाबत बोलताना वेस्‍टर्न डिजिटलचे भारतातील विक्रीचे वरिष्‍ठ संचालक श्री. खालिद वानी म्‍हणाले, ”प्रबळ ड्राइव्‍ह्स त्‍यांची कार्यक्षमता, गती, विश्‍वसनीयता आणि देणा-या सुलभ सुविधेमुळे स्‍टोरेज उद्योगक्षेत्रामधील पुढील मोठे आविष्‍कार आहेत. आमचे नवीन डब्‍ल्‍यूडी एलीमेण्‍ट्स™ एसई एक्‍सटर्नल एसएसडी मॅक व पीसी युजर्ससाठी उत्‍पादकता-केंद्रित सोल्‍यूशन आहे.”

वेस्‍टर्न डिजिटलचे भारतातील विपणनचे वरिष्‍ठ संचालक श्री. जगन्‍नाथन चेल्लिया म्‍हणाले, ”वेस्‍टर्न डिजिटल मॅक व पीसी युजर्सना सोईस्‍करपणे त्‍यांच्‍या कन्‍टेन्‍टचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये साह्य करण्‍यासाठी नवोन्‍मेष्‍कारी तंत्रज्ञान सादर करण्‍यावर लक्ष केंद्रित करते. डब्‍ल्‍यूडी एलीमेण्‍ट्स एसई एक्‍सटर्नल एसएसडीमध्‍ये कार्यक्षमता, सुसंगत आकार आणि क्षमतेचे सर्वोत्तम संयोजन आहे. बॅक अपसाठी, तसेच विविध डिवाईसेसदरम्‍यान कन्‍टेन्‍ट शेअर करण्‍यासाठी उत्तम साधनाचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांसाठी हे उल्‍लेखनीय डिवाईस आहे.”
प्रति सेकंद जवळपास ४०० एमबी* रीड गती (वाचन गती) आणि जवळपास २ टीबीपर्यंतच्‍या क्षमतांसह हे नवीन पोर्टेबल एसएसडी ग्राहकांना जलदपणे मोठ्या फाइल्‍स हस्‍तांतर करण्‍याची सुविधा देते, ज्‍यामुळे ते दररोज अधिक कार्य करू शकतात. ड्राइव्‍हच्‍या प्‍लग-अॅण्‍ड-प्‍ले कार्यक्षमतेमुळे हे डिवाईस वापरण्‍यास प्रत्‍येक वेळी सुसज्‍ज असल्‍याची खात्री मिळते आणि कोणत्‍याही कार्यप्रवाहामध्‍ये एकसंधीपणे सामावून जाऊ शकते.
डब्‍ल्‍यूडी एलीमेण्‍ट्स एसई एसएसडीची डिझाइन सुसंगत व पोर्टेबल आहे, तसेच ते जवळपास २ मीटरपर्यंत ड्रॉप-रेसिस्‍टण्‍ट आहे, ज्‍यामुळे तुमच्‍या चालत्‍या-फिरत्‍या जीवनशैलीसाठी ही अत्‍यंत परिपूर्ण ड्राइव्‍ह आहे. वेस्‍टर्न डिजिटलचा टिकाऊपणाचा स्‍टोरेज वारसा कायम राखणारी ही ड्राइव्‍ह जगभरात तीन वर्षांच्‍या मर्यादित वॉरंटीसह येते.

किंमत आणि उपलब्‍धता
डब्‍ल्‍यूडी एलीमेण्‍ट्स एसई एसएसडी Amazon.in, फ्लिपकार्ट, क्रोमा रिटेल आणि देशभरातील इतर आघाडीच्‍या आयटी व मोबिलिटी स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहे. एमएसआरपी ६४९९ रूपयांसह किंवा ४८० जीबी* क्षमतेच्‍या ड्राइव्‍हसह सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *