नागपुरात कोव्हिड लसीकरणासाठी ८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान मिशन कवच कुंडल

उपराजधानी नागपूर

नागपूर : कोव्हिडच्या संभाव्य लाटेचा धोका आणि त्याअनुषंगाने नागरिकांची सुरक्षा व्हावी यासाठी लसीकरणासाठी पात्र प्रत्येक व्यक्तीने लस घेणे आवश्यक आहे. यासाठी मनपाद्वारे ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान शहरात लसीकरणासाठी मिशन कवच कुंडल विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यासंबंधी महाराष्ट्र राज्य अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी आदेश जारी केले असून त्याची अंमलबजावणी नागपूर शहरात करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये व नागपूर शहरात १६ जानेवारी २०२१ पासून कोव्हिड लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. सुरुवातील फ्रंट लाईन वर्कर [ front line worker ]  पुढे ४५ ते ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर १८ वर्षावरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. नागपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी शहरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. शहरात सध्या १५५ लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था आहे.

GOOD NEWS : देशभरात महिला पोलिसांची संख्या दुप्पट

लसीकरणाच्या विशेष मोहिमेसाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाचे शिक्षण विभाग, महिला बालविकास विभाग, महसूल विभाग व अन्य संबंधित विभागांना निर्देशित केले आहे. मनपाच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभागनिहाय लसीकरणाबाबत मनपाची चमू कार्य करणार आहे. याकरिता आरोग्यसेविका, अधिपरिचारिका, डॉक्टर्स, इंटर्नस हे स्वयंसेवक म्हणून कार्य करणार आहेत.

नागपूर शहरातील ७५ टक्क्यांच्या वर नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोज घेतला आहे. यापैकी अनेकांनी दुसरा डोज घेतला तर अनेकांचा दुसरा डोज अद्याप बाकी आहे. दुसरा डोज बाकी असलेल्यांनी लवकरात लवकर आपले दोन्ही डोज पूर्ण करून घ्यावे. याशिवाय अजूनही ज्यांनी पहिला डोज घेतलेला नाही त्यांनी लसीकरणाचे महत्व ओळखून त्वरीत आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

ही बातमी सुद्धा वाचा :काठीला त्याने पाय बनवला आणि चालतोचि वाट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *