शेतकºयांच्या हत्याप्रकरणी आज महाराष्ट्र बंद

राजधानी मुंबई

मुंबई : उत्तर प्रदेशात केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकºयांना आपला वाहनाखाली चिरडून ठार मारल्या प्रकरणाचे देशभरात तीव्र संताप उमटले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 11 आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या अखिल भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलक शेतकºयांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा समावेश असणाºया वाहनाने चिरडून मारले. विविध पक्ष व संघटनांनी महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी 11 आॅक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. या बंदला अनेक संघटना पाठिंबा दिला असून, सुरक्षाच्या दृष्टीने बंदोबस्त लावण्यात आला आहे.
राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र बंद पाळण्यात येत असल्याने शाळा आणि महाविद्यालय बंद राहण्याची शक्यता आहे. याशिवाय वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी बंदमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *