Home विदर्भ यवतमाळ सेवाश्रय संस्थाच्या वतीने ‘सेवाश्रय नवरत्न नारी सन्मान’ पुरस्कार जाहीर

सेवाश्रय संस्थाच्या वतीने ‘सेवाश्रय नवरत्न नारी सन्मान’ पुरस्कार जाहीर

95
SEWASHRAY NAVRATN NARI SANMAN 2021

यवतमाळ : सेवाश्रय ग्रामीण बहुद्देशीय विकास संस्था, दिघीच्या वतीने ‘सेवाश्रय नवरत्न नारी सन्मान’ पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यात नऊ क्षेत्रात काम करणाºया नऊ महिलांचा समावेश आहे.

सेवाश्रय संस्थाच्या वतीने सार्वजनिक जीवनातील विविध कार्यक्षेत्रात कार्यरत महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने यंदा पहिला ‘सेवाश्रय नवरत्न नारी सन्मान’ [ SEWASHRAY NAVRATN NARI SANMAN 2021 ] पुरस्कार घोषित केला आहे. यात समाजसेवा क्षेत्रातून अपूर्वा सोनार (यवतमाळ), वाड्.मय क्षेत्रात मीनल येवले (नागपूर), रंजना वानखडे (वर्धा) क्रीडा क्षेत्र, डॉ. निशा भुसारी (नागपूर) यांना आरोग्य क्षेत्रातून, संजीवनी पाटील (अमरावती) यांना उद्योग क्षेत्रातून, वर्षा मानकर (नागपूर) यांना शिक्षण क्षेत्र, नीता सोनवणे (नागपूर) यांना पत्रकारिता, अंजली निसळ (नागपूर) यांना संगीत आणि मेघा पाटील (नागपूर) यांना बचतगट क्षेत्रातील कार्याबद्दल हा सन्मान जाहीर झाला आहे. लवकच एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संजय मुंदलकर यांनी कळवले आहे.

थोडक्यात सेवाश्रय
महिला आणि तरुणांसाठी तांत्रिक शिक्षण-प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती, महिला सबलीकरण हे मुख्य उ्द्दिष्ट सेवाश्रयने आपल्यासमोर ठेवले आहे़ याशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आॅफलाईन वा आॅनलाईन पद्धतीने विविध स्पर्धा (यात मुख्यत्वे विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञानावर आधारित), महिलांमध्ये आरोग्य आणि स्वयं रक्षणाची जागृती आणि प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.
याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र महिला आर्थिक विकास मंडळासोबत विविध योजनांच्या माध्यमातून आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर प्राधान्य क्रमाने भर देण्याचा संकल्प आहे.