एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मादिनानिमित्त संपूर्ण देशातून आदरांजली

राष्ट्रीय
MISSILE MAN JANMDIN : भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मादिनानिमित्त संपूर्ण देश त्यांना आज आदरांजली वाहत आहे. [  MISSILE MAN JANMDIN APJ ABDUL KALAM ]
भारताचे ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलाम यांना आदरांजली वाहताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे की, भारताला शक्तिशाली समृद्ध आणि समर्थ बनवण्यासाठी कलाम यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांचे कार्य  देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील.

“जनतेचे राष्ट्रपती म्हणून लौकिक मिळवलेले कलाम हे प्रख्यात संशोधक होते. भारताची संरक्षण सिद्धता तसंच अंतराळ विज्ञानातली प्रगती यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले”, असे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ‍यांनी  राजभवन येथे डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन त्यांना आपली आदरांजली वाहिली. कलाम यांच्या तामिळनाडूमधील  रामेश्वरम इथल्या जन्मस्थळीही कलामांची जयंती साजरी होत आहे. यानिमित्त रामेश्वरमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी  कलाम राष्ट्रीय स्मृतीस्थळावर पुष्पांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *