विजयादशमी उत्सवानिमित्त नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन

उपराजधानी नागपूर
NAGPUR : देशाचा इतिहास नव्या पिढीला समजायला हवा. विषमतेवर आधारित समाजव्यवस्था शाश्वत नाही, त्यामुळे समाजाला जोडणारी भाषा वापरायला हवी, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते.

नागपूरच्या रेशीमबागेत झालेल्या कार्यक्रमात शस्त्रपूजनही करण्यात आले. यात मर्यादित स्वयंसेवक सहभागी झाले होते.

देशभरात दसरा सण उत्साहात साजरा

देशामध्ये अवैध घुसखोरांवर नजर ठेवण्यासाठी डॉ. भागवत यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) तयार करण्याची गरज असल्याचही सांगितले. भारतासारख्या देशासाठी सर्व समाजघटकांना लागू होणारे लोकसंख्या धोरण अत्यावश्यक असल्याचंही ते म्हणाले. पुढील ५० वर्षांचा विवेकी विचार करून लोकसंख्या धोरण सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *