नागपुरातील कलावंतांचा ‘मेरी सोहनिया’ म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित

सिनेरंग ... चित्रपट / संगीत / नाटक / नृत्य

नागपूर : नागपुरातील कलाकारांचा समावेश असलेला म्युझिक व्हिडिओ ‘मेरी सोहनिया’  13 आॅक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. हे गाणे झी म्युझिक वाहिनीवर पाहता येणार आहे. [ MERI SOHANIYA MUSIC VIDIO ON ZEE MUSIC ]

म्युझिक व्हिडिओमधील संपूर्ण छायाचित्रण नागपूर परिसरातील वेगवेगळ्या भागात चित्रित करण्यात आले आहे़ यातील स्टारकास्ट आफताब शेख, हुमेरा खान, रितेश गायकवाड, तौकीर आलम ही आहेत.

सा रे गा मा पा रिअ‍ॅलिटी शो विजेती इशिता विश्वकर्मा आणि गिरीश ठाकूर यांनी गायिले असून, संगीत यक्शज जगताप यांनी दिले आहे.
गाण्याचे निर्माते फॅबक्रिएटर्स एंटरटेनमेंट ओपीसी प्रा. लि. यांच्या वतीने फिरोज आलम सय्यद आहेत. दिग्दर्शन रॉबिन फ्रान्सिस यांनी केले असून, मार्केटिंग प्रमुख ग्लोबल प्लेक्स हे आहेत.

छायाचित्रण अमोल गजभिये, आदर्श राऊत, प्रणव निमगडे, गुड्डू रामटेके यांचे आहेत. मेकअप तबस्सूम खान आलम यांचे असून, फॅशन डिझायनर इश्मानिया आणि सारा एथनिक आहेत. कास्टिंग स्टायलो मॉडेलिंग ग्रूपच्या वतीने करण्यात आली आहे. संपादन वरुण कुमार यांनी केले आहे.
अन्य टीममध्ये हर्ष मिर्झा, शान मिर्झा, सलमान ताजी, सोफिया सिंग, प्रतीक्षा, यश, निशांत प्रतीक, आयुषी, निवेदिता, खुशी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *