उद्योजक बनवणारी विद्यापीठं स्थापन होण्याची गरज : नितीन गडकरी 

उपराजधानी नागपूर

नागपूर : उद्योजक बनवणारी विद्यापीठं देशात स्थापन होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी [ UNION MINISTER NITEEN GADKARI ] यांनी नागपूरमध्ये केले.

वनराई फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आज त्यांच्या हस्ते कमानी ट्यूबच्या अध्यक्ष कल्पना सरोज [ KAMANI TUBE PRESIDENT KALPANA SAROJ ] यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचं स्वरूप आहे.

नागपुरातील कलावंतांचा ‘मेरी सोहनिया’ म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित

तंत्रज्ञानामुळे जग वेगाने बदलत आहे, अशा परिस्थितीत देशाला नवी उंची गाठून देणारे उद्योजक देशात तयार होण्यासाठी तशी विद्यापीठं निर्माण व्हायला हवीत, असं ते म्हणाले. कल्पना सरोज यांनी अनेक संकटांवर मात करून लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आता दलित समाजातील 100 मुलामुलींना उद्योजक बनवण्यााचा वसा हाती घ्यावा, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे गडकरी म्हणाले.

महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे निर्देश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *