ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत ४ कोटींहून अधिक कामगारांची नोंद

राष्ट्रीय

नवी दिल्ली : देशभरातील असंघटित कामगारांचा माहितीसाठी गोळा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-श्रम पोर्टलवर [ E-SHRAM PORTAL ] आतापर्यंत ४ कोटींहून अधिक कामगारांची नोंदणी केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंदर यादव यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. यात महाराष्ट्रातून ९ लाख ६३ हजारांहून अधिक कामगारांचा समावेश आहे.

ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या चार राज्यांमधून सर्वाधिक कामगारांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या एकूण असंघटित कामगारांपैकी सुमारे ५० टक्के महिला तर ४९.९८ टक्के पुरुष कामगार आहेत. कामाच्या वर्गवारीनुसार सर्वाधिक नोंदणी कृषी आणि बांधकाम क्षेत्रात झाली आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्याने कामगारांना त्यांच्यासाठीच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणं अधिक सुलभ होणार असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

असंघटित कामगार आपल्या मोबाईलवरून ई-श्रम या पोर्टलच्या माध्यमातून, तसंच राज्यातल्या समूह सेवा केंद्र, राज्य सेवा केंद्र्र, कामगार सुविधा केंद्र, टपाल कार्यालयाच्या डिजिटल सेवा केंद्रांपैकी काही निवडक टपाल कार्यालयांना भेट देत स्वत:ची नोंदणी करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *