केरळमध्ये मुसळधार पावसामुळे २३ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय

. लष्करी जवानांकडून मदतकार्य
. बहुतांश मृत्यू भूस्सखलनामुळे

तिरुवनंतपुरम् : केरळमध्ये कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडणाºयांची संख्या २३ वर पोहोचली आहे. इडुक्कीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या ठिकाणी सहाजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यात ४ बालकांचा समावेश आहे. [ LANDSLIDING AND FLOOD IN KERAL ]

कोट्टायम जिल्ह्यात कूट्टिकल पंचायतीमध्ये देखील शनिवारी भूस्खलन झालेल्या ठिकाणी आतापर्यंत ११ जणांचे मृतदेह सापडले. भूस्खलन झालेल्या दोन्ही ठिकाणी मातीच्या ढिगाºयाखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरु आहे.

केरळच्या विविध भागांत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्य वीज मंडळ आणि जलसिंचन विभागाच्या अखत्यारीत येणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मल्लापल्ली जिल्ह्याला पुराचा फटका सर्वात जास्त बसला असून मदतकार्य चालू आहे. अलापुळा जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांची पातळी वाढत असून नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

दरम्यान,अरबी समुद्रावरचा कमी दाबाचा पट्टा आता ओसरत असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. केरळात येत्या चोवीस तासात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी येण्याची शक्यता आहे.

आवश्यक ती सर्व मदत पुरवणार : अमित शहा

केरळातल्या पूरस्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून असून, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकार शक्य ते सर्व सहाय्य करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या मदतकायार्साठी आधीच रवाना झाल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *