महाराष्ट्र अंनिस नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी ॲड. समीर शिंदे

उतर महाराष्ट्र

नाशिक : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक नुकतीच हुतात्मा स्मारक येथे झाली. त्यात जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली.
जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- डाॅ शशांक कुलकर्णी, उपाध्यक्ष- डाॅ शिवराम हिरे, जिल्हा कार्याध्यक्ष- ॲड. समीर शिंदे, जिल्हा प्रधान सचीव- नितिन बागुल, बुवाबाजी संघर्ष विभाग – महेंद्र दातरंगे, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प- रविंद्र आहिरे, महिला सहभाग – नम्रता जगताप, विविध उपक्रम-प्रा.सुशीलकुमार इंदवे.

राज्य निरीक्षक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे (नंदुरबार) यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डाॅ. टी.आर.गोराणे, प्रा.डाॅ. सुदेश घोडेराव, राजेंद्र फेगडे, कृष्णा चांदगुडे, विजय खंडेराव आदी उपस्थित होते.या प्रसंगी नाशिक जिल्ह्यात संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *