यवतमाळात सर्वशाखीय माळी समाज उपवर नाव नोंदणी कार्यक्रम ३१ आॅक्टोबरला

यवतमाळ

यवतमाळ : सर्वशाखीय माळी संघाद्वारा २६ वे राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय संमेलनाचे आयोजन अमरावती येथे होत आहे.

यानिमित्ताने विवाह इच्छुक उपवर युवक-युवतीचे नि:शुल्क नाव नोंदणी अभियान ३१ आॅक्टोबर २०२१ रोजी नरेंद्र कावलकर यांचे निवास स्टेट बँक चौक यवतमाळ येथे आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय कावलकर राहतील. महामेळाव्याचे संयोजक प्रा. श्रीकृष्ण बन्सोड, ओमप्रकाश अंबाडकर, प्रा. एऩ आर. होले, मधुकर आखरे, नंदकिशोर वाठ, दत्ता चांदुरे यांची उपस्थिती राहणार आहे.

ऋणानुबंधामध्ये नि:शुल्क नोंदणीसाठी उपवर युवक-युवती, पुनर्विवाह, विधवा, विधूर आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन नरेंद्र कावलकर, महेंद्र पिसे, रमेश अंबाडकर, प्रभाकर सुकळकर, इंजि. अशोक तिखे, प्रा़ शशांक केंढे, अँड. अरुण मेत्रे, नरेंद्र भुस्कट आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *