राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती

राजकारण

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर [ RUPALI CHAKANKAR ] यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल राज्य सरकारकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मागील काही काळापासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे पद रिक्त होते़ राज्यातील महिला अत्याचाराचे प्रकार घडताच या पदाची तीव्रतेने राजकीय पक्षांना आठवण येत होती. अशातच आता रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज बुधवारी राज्य सरकारकडून अधिसूचना काढली त्या उद्या, गुरुवारी महिला आयोगाच्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

रुपाली चाकणकर यांचा नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा प्रवास आहे. असे असले त्या महिला प्रश्नावर पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देत असतात. याशिवाय राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या आणि यशस्वीरित्या सांभाळली आहे. संपूर्ण राज्यभर आपल्या पक्षाचे महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *