दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत अनुक्रमे २९ आणि २७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

शिक्षण

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.

इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी [  ] १ लाख २१ हजार ३६३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. पैकी १० हजार ४७७ जणांनी परीक्षा दिली; त्यापैकी केवळ तीन हजार ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी २९.१४ टक्के आहे.

इयत्ता १२ वीच्या नवीन अभ्याक्रमानुसार पुरवणी परीक्षेसाठी यंदा २ हजार १०९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यापैकी १८०९ विद्यार्थी हजर होते, तर ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण २५. ८७ टक्के इतके आहे.

तसेच, इयत्ता १२ वीच्या जुन्या अभ्याक्रमानुसार परीक्षेसाठी १२ हजार ५३४ जणांनी अर्ज केला होता, तर यापैकी १२ हजार १६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील केवळ ३ हजार ३२२ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्णाचे प्रमाण २७.३१ टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *