असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मंजुरी

राजधानी मुंबई

मुंबई : राज्यातील ॲटोरिक्षा चालक, टॅक्सीचालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ [ MINISTER HASAN MUSHREEF ] यांनी तत्वत: मंजुरी दिली.

राज्यातील समस्त शेतकरीबांधवांसाठी कृषिमंत्र्यांची केंद्र सरकारकडे ‘ही’ मागणी…

तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.  बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, असंघटित विकास आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते.

भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’

असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी संबंधित विभागांकडून प्रस्ताव सादर करण्याबाबत तसेच यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याबाबतच्या सूचना मंत्री श्री.मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *