करवा चौथ

अध्यात्मिक
संत राजिंदर सिंहजी  महाराज

कधी आपण विचार केलाय का की करवा चौथ या व्रताचा उद्देश काय आहे? या व्रताचे सुद्धा अन्य व्रतां प्रमाणे एक अध्यात्मिक महत्व आहे. आपल्या देशाच्या कणाकणात अध्यात्मिकता व्यापून आहे. आपले सर्व सण, उत्सव आणि व्रते आत्मोन्नती करिता बनविले गेले आहेत. ही व्रते सुरुवातीपासून अंततः मुक्ती व प्रभू प्राप्तीकरिता केली जात होती; परंतु हळूहळू आपण याचा वास्तविक अर्थ विसरून गेलो. तसेच, संसारिक रितीरिवाज व तामसिक वासनांमध्ये अडकून राहिलो. करवाचौथ व्रताची कहाणी अशी आहे की, ज्यामध्ये पहाटे आकाशात तारे चमकत असताना व्रत ठेवले जाते आणि संध्याकाळी चंद्र दर्शन करून व्रताचे पारणे केले जाते. वास्तविक  हे व्रतं प्रतीकात्मक आहे जे आपणास अध्यात्माच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापासून घेऊन जाते. हे व्रत आत्मा परमात्म्याच्या मिलनाच्या, एका ध्येयाचे वर्णन आहे. यामध्ये दिवसभर स्त्रियांनी काही काम करता कामा नये. त्यांनी पूर्ण दिवस प्रभूच्या स्मरणात व्यतीत करावा, न की टीव्ही पहाणे, सिनेमा पाहणे किंवा तंबोला खेळणे किंवा गप्पा-गोष्टी करण्यात घालवावा.

इतिहास साक्षी आहे की, प्रत्येक धर्मात कोणत्या ना कोणत्या दिवशी किंवा रात्रीचे वर्णन आले आहे. यामध्ये म्हटले जाते की समस्त प्राणी, समस्त जीवजंतू प्रभूचे स्मरण करतात. मुस्लिम बांधवांमध्ये जो ईदचा सण साजरा केला जातो, त्यामध्ये सुद्धा चंद्राचे वर्णन केले जाते आणि ते तेव्हाच ईद साजरी करतात जेंव्हा चंद्र दर्शन करतात. परंतु हा तर बाहेरचा चंद्र आहे. हा तर प्रत्येक रात्री दिसतही नाही. परंतु जो आंतरिक चंद्र आहे त्याला आपण कधीही पाहू शकतो. तोच वास्तविक चंद्र आहे. आंतरिक चंद्रदर्शनानेच आपण करवा चौथच्या व्रता पासून वास्तविक लाभ प्राप्त करू शकतो.

हे व्रत तेंव्हाच आपल्या करिता फलदायी आहे जेंव्हा आपण पहाटे आपल्या अंतरी तारे पाहू, दिवसभर प्रभुचे स्मरण करू, नामस्मरण व भजन करू आणि संध्याकाळी आपल्या अंतरी चंद्रदर्शन करू, याच क्रमाने सूर्य किंवा नंतर आपल्या सद्गुरूंच्या तेजस्वी स्वरूपाला अंतरी पाहू, जे आपल्या अंतःकरणातील चंद्र आहेत. जे की आपल्या आत्म्याचे चंद्र आहेत. करवाचौथ या व्रताला साजरी करण्याची हीच योग्य व चांगली पद्धती आहे.

*****
2 Attachments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *