WE MUST SAVE WATER : पाणी समस्यावर दीर्घकालीन उपाय

पर्यावरण

राज्यात दिवसेंदवस पाणी समस्या अधिकाधिक तीव्र होत चाललेली आहे. पाण्याचा अपुºया साठ्यामुळे जनता हैराण झाली आहे. शिक्षणामुळे तरुण गावांकडून शहराकडे येत आहेत. गावे ओस पडत चालली आहेत तर वाढत्या शहरीकरणामुळे शहरांच्या समस्या वाढत आहेत. पाणी समस्येवर तात्पुरत्या उपायांबरोबर कायमचे दीर्घकालीन सर्वंकष उपाय सर्व थरातून तातडीने करण्याची गरज आहे.

राज्यात दिवसेंदवस पाणी समस्या अधिकाधिक तीव्र होत चाललेली आहे. पाण्याचा अपुºया साठ्यामुळे जनता हैराण झाली आहे. शिक्षणामुळे तरुण गावांकडून शहराकडे येत आहेत. गावे ओस पडत चालली आहेत तर वाढत्या शहरीकरणामुळे शहरांच्या समस्या वाढत आहेत. गावे ओस पडण्याच्या अनेक कारणांपैकी शेतीसाठी अशाश्वत पाणीपुरवठा व गावकºयांना स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी गावात उपलब्ध नसणे हेही महत्त्वाचे कारण आहे. राज्यात १९५२, १९७२, १९९१, २००३ आणि २०१२ पासून सततच्या दुष्काळामुळे पाणी समस्या अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. पाणी समस्येवर तात्पुरत्या उपायांबरोबर कायमचे दीर्घकालीन सर्वंकष उपाय सर्व थरातून तातडीने करण्याची गरज आहे.

उत्तरेच्या हिमालयीन बारमाही वाहणाºया नद्यांच्या पुराचे पाणी मध्य, दक्षिण, पश्चिम भारतीय नदी प्रवाहात वळवणे आवश्यक आहे. हिमाचल, सिक्कीम, अरुणाचल, आसाम, बिहार, बंगाल, ओरिसातील भरून वाहणाºया नद्यांचे पाणी मध्यप्रदेश,राजस्थान,गुजरात,महाराष्टÑ, तेलंगणा,आंध्र प्रदेश, कर्नाटक इ. राज्यातील कोरडवाहू,दुष्काळी प्रदेशाकडे वळवावे, यामुळे पुरामुळे होणारे नुकसान टळेल. हिमालयातून समुद्राकडे जाणारे पाणी वाया न जाता पावसावर अवलंबून असणाºया प्रदेशाला वरदान ठरेल.भविष्यातील उग्र पाणी समस्येवर हा एक उपाय तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.

राज्यातील समुद्रकिनारी प्रदेशातील पावसाचे पाणी जागोजागी अडवून ते लिफ्ट करून पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागाकडे वळवणे या उपायाने कोकणपट्टीत पडणारे पावसाचे पाणी अडवून समुद्रात वाया न घालवता घाटमाथ्यावर चढवले तर पश्चिम महाराष्टÑ, उत्तर महाराष्टÑ, मध्य महाराष्टÑ, मराठवाडा या पर्जन्याधारित भागाला वरदान ठरेल आणि मोलाचे समुद्रात वाया जाणारे पाणी वाचेल. भविष्यातील भीषण पाणीटंचाईवर हा उपाय शासकीयस्तरावरून तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. या उपायाने निम्म्यापेक्षा अधिक महाराष्टÑ हिरवा बनेल.समुद्राचे पाणी शुद्ध करून त्या पाण्याचा उपयोग करून शहरातील पाणी समस्या दूर करण्यासाठी करता येऊ शकेल. समुद्राचे पाणी शुद्ध करण्याच्या प्रकल्पाला सौर ऊर्जा, वायू ऊर्जा, समुद्रलाटांची ऊर्जा इत्यादी वापरता येऊ शकेल. पाणी समस्येवर कायमची मात करण्यासाठी काही उपाय पुढीलप्रमाणे सूचवावेसे वाटतात.

बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी आहारात घ्या आयोडिनयुक्त मीठ

धरणजोड प्रकल्प:महाराष्टÑातील काही धरणे वेगाने गाळाने भरली आहेत. त्यामुळे काही धरणे काही वर्षानंतर भरून वाहू लागतात, काही धरणे कधीच भरत नाहीत. या सर्व धरणांच्या जोड प्रकल्पाचा फायदा धरण भरण्यात होऊन त्या धरण क्षेत्रातील जनतेला पाणी मिळेल.

धरणातील गाळ काढणे:महाराष्टÑातील जवळजवळ सर्वच धरणे गाळाने भरलेली आहेत. त्यामुळे त्या धरणांची पाणी साठवणक्षमता कमीकमी होत चालली आहे. उदाहरणार्थ, जायकवाडी धरणाची पाणी साठवणक्षमता मोठी असली तरी याचा एक स्टॉक ५० टीमसी असला तरी गाळामुळे प्रत्यक्षात ‘डेड स्टॉक’ अल्पच असणार. या सर्व धरणातील गाळ काढल्यास त्या गाळामुळे आजूबाजूच्या प्रदेशातील नापिक जमिनी सुपीक होऊन अधिकाधिक जमीन/क्षेत्र लागवडीखाली येईल.शिवाय धरणाची पाणी साठवणक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.

नद्यांचे पुनरुज्जीवन:राज्यातील धरणांमधील गाळाची समस्या दूर करण्याबरोबरच सर्व नद्यातील ओढे, नाले यामधील गाळे काढणे, नद्यांचे रुंदीकरण, गाळ काढून खोलीकरण करणे, या नद्या, नाले, ओढ्यांवर माथा ते पायथा, चढणीकडून उताराकडे दर ३०० मीटरवर बंधारा घालून पाणी अडवून जिरवणे, आजूबाजूच्या जमिनीत पाणी मिरवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे या उपायाने ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर तातडीने करावीत. ही कामे शासन, अशासकीय सेवाभावी संस्था, तज्ज्ञ व्यक्ती आणि गावकरी या सर्वांच्या सहभागाने करावीत.

जलयुक्त शिवार योजना:महाराष्टÑ शासनाची जलयुक्त शिवार योजना सर्व गावकºयांच्या अत्यंत फायद्याची आहे.ही योजना ग्रामस्थांची योजना होऊन शासनाच्या सहभागाने पूर्ण करावी. कुठल्याही गावाने याबाबतीत वेळ न दवडता ही कामे लगेच करून घ्यावीत. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात दूर होईल.

एक गाव, एक परिवार मोहीम:मुंबई दूरदर्शनने २०१२ च्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी गावाची वॉटर बँक, शेताची वॉटर बँक, जनावरांसाठी वॉटर बँक, कुटुंबाची पण्याच्या पाण्याची वॉटर बँक इत्यादीसाठी ‘एक गाव एक परिवार’ ही मोहीम २०१४ पर्यंत राबवली, अशी मोहीम आता परत राबवण्याची गरज आहे.

आधुनिक तंत्रांचा वापर: कमीत कमी क्षेत्रात, कमीत कमी पाण्यात, कमीत कमी वेळेत जास्त उत्पादन देणारे कृषी उत्पादने, भाजीपाला, फळे घ्यावीत यासाठी उपलब्ध ग्रीन हाऊस, नेटहाऊस, पॉलीहाऊस तंत्र वापरणे, एकात्मिक खत व्यवस्थापन, सेंद्रीय खते, जैविक खते, हिरवळीची खते वापरून टप्प्याटप्प्याने सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेतीतंत्र वापर करावा, रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय जैविक खतांमुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण, जमिनीची जलधारण क्षमता वाढते, पिकांना कमी पाणी लागते.शासनाचे काम शासन करीतच आहे, पण सर्व गावकºयांनी एकत्र येऊन स्वावलंबी गावासाठी एकत्रित, एकजुटीने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे, असे झाले तर पोपटराव पवारांच्या हिवरे बाजार गावासारखे पाण्याच्या बाबतीत आपलेही गाव स्वावलंबी बनेल,अशी खात्री आहे.

 

Edited by : Shilpa Wakalkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *