fencing

राज्यातील पाच ठिकाणी फेन्सिंगसाठी डेडिकेटीव्ह हॉल निर्मिती

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : राज्यात फेन्सिंग (तलवारबाजी) खेळाला चालना मिळावी. या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी राज्यातील खेळाडूंना उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यात फेन्सिंग ( FENCING ) साठी डेडिकेटीव्ह हॉल निर्माण करण्यात येणार आहेत. या हॉलसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ३२ व्या राज्यस्तर वरिष्ठगट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात  केले.

महिलांसाठी कृषी मंत्रालयाची मोठी घोषणा, कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव 

महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या राज्यस्तर वरिष्ठगट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात छत्रपती शाहू महाराज व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक महिला ठाणे निर्माण करा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोव्हिडनंतर आता स्पर्धा सुरु झाल्या आहेत. कोल्हापूर ही शौर्याची भूमी आहे. या भूमित फेन्सिंग(तलवारबाजी) राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा सन्मान जिल्ह्याला लाभला आहे. कोल्हापुरातील या स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी राज्याची टीम तयार होणार आहे, हा अभिमान कोल्हापुरकर म्हणून मोठा आहे. या स्पर्धेतून 24 खेळाडूंची निवड पटियाला येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडली जाणार आहे. राज्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकविण्यासाठी खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवावे. या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्रला सांघिक व वैयक्तिक गटात विजतेपद मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व स्पर्धेतील सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *