कोविडमुळे अनाथ झालेल्या ५२ बालकांच्या खात्यात राज्य शासनाकडून ५ लाखाची मुदतठेव

उपराजधानी नागपूर
  • पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याहस्ते प्रमाणपत्रांचे वाटप

नागपूर :  कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या पाठीशी राज्याचे आघाडी शासन पालक म्हणून उभे आहे. या बालकांच्या संगोपनात पाच लाखाची मुदत ठेव निश्चितच महत्त्वाची ठरणार आहेतथापि,आपल्या दुःखापुढे ही मदत काहीच नाही. मात्र फुल ना फुलाची पाकळी म्हणून शासनाने दिलेल्या या मदतीचा योग्य वापर कराआपले जीवन घडवाअसे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा  पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. [ NITEEN RAUT DISTRBUTING CORONA FIX DEPOSIT CERTIFICATE ]

कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना 5 लक्ष रुपयाचे मुदत ठेव प्रमाणपत्र व अनाथ प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरबाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरातबाल न्याय मंडळाचे सदस्य श्री. जोगीसुरेखा बोरकुटेअतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. साळवेएकात्मिक बाल विकास अधिकारी चिचाणे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण आदी उपस्थित होते.

 राज्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवासाठी डायल 112 प्रकल्प लवकरच कार्यान्वित : गृहमंत्री 

 ज्या बालकांचे वय 18 पेक्षा कमी आहेतअशी नागपूर जिल्ह्यात 71 बालके अनाथ आहेत. त्यापैकी 61 बालकांच्या बँकेत खाते उघडण्यात आले आहेत. 52 लाभार्थ्यांची रक्कम सेंट्रल बँक इंडीयामध्ये जमा झालेली आहे. अनाथ झालेल्यांना वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुदत ठेवची रक्कम मिळणार आहे. जीवनात आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. या संकटाच्या काळात या अनाथांच्या पाठिशी आपण उभे राहिले पाहिजेअशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली. राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे  कोविड काळात अनाथ बालकांना मदत करण्याचा निर्णय झाला. पाच लाख रुपयांची मदत पुरेशी आहेअसा आमचा दावा अजिबात नाही. आई-वडीलांची भरपाई कुणीही करू शकत नाही. परंतु फुल ना फुलाची पाकळी या न्यायाने महाविकास आघाडी सरकारने ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत ठेव निश्चितपणे आपल्या भावी आयुष्यात कामी येणार आहेअसे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्वीकारली सेजलच्या भावंडांच्या शिक्षणाच्या जबाबदारी

कोविड –19 महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनाकडून पाच लक्ष रुपयाची मदत मुदत ठेव प्रमाणपत्राच्या स्वरुपात दिल्या जात आहे. त्यातून त्या अनाथ बालकांचे सुरळीत संगोपन व शिक्षणाची जबाबदारी पार पाडल्या जाणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 52 अनाथ बालकांना शासनाकडून 5 लक्ष रुपयाची मुदत ठेव मंजूर करण्यात आली असून आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते मुदतठेव प्रमाणपत्र संबंधितांना वितरीत करण्यात आले. त्या सोबतच अनाथ प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रारंभी दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *