मोठा निर्णय, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी

राजधानी मुंबई
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने एस.टी.कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार [ deputy chief minister ajit pawar ] यांनी आज दिले. त्यानुसार तातडीने निधी वितरित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संकट काळात एस.टी. [ MAHARASHTRA STATE ROAD TRANSPORT CORPORATION ] कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी या सरकारची भूमिका आहे.

YOU MUST STOP ONE SECOND : रस्ता सुरक्षा आपली जबाबदारी

कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने एस.टी.च्या वाहतुकीवर परिणाम झाला. प्रवासी संख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली. या कठीण परिस्थितीचा विचार करता परिवहन महामंडळाला उपमुख्यमंत्र्यांनी 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले व त्याची तत्काळ अंमलबजावणी झाली. या निर्णयामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *