यंदा कडाक्याची थंडी, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक

पर्यावरण

नवी दिल्ली : यंदा परतीचा पाऊस खूपच उशिरा संपला असून, आता हिवाळा चांगलाच कडाक्याचा पडणार असल्याची माहिती ब्लूमबर्गकडून देण्यात आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात थंडीचा सर्वाधिक कहर असेल, असा अंदाजही संबंधित अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. [ this year heavy cold in india ]

मागील काही दिवसांत उत्तर भारतातील अनेक राज्यात कोसळलेल्या दमदार पावसानंतर देशात तापमानाचा खाली आला आहे. वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे.

दुसरीकडे प्रशांत महासागराच्या परिसरात सध्या ‘ला नीना’ या वातावरणीय बदलाचा फटका उत्तर पूर्व आशियातील बहुतांशी देशांना बसेल, असा अंदाज आहे. आर्क्टिक समुद्रात बर्फाचे प्रमाण घटल्यामुळे वायव्य आशियात कडाक्याची थंडी पडू शकते. गेल्या वर्षी देखील अशीच स्थिती उद्भवली होती. त्यामुळे यंदाही जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान देशात हाडं गोठावणारी थंडी पडू शकते, असे ब्लूमबर्गने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *