लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता जनजागृती सप्ताह

उपराजधानी नागपूर

नागपूर : दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन होत असतानाच यंदाही 26 आॅक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह [ VIGILANCE AWARENESS 2021 ]  साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रातील सर्व घटकांतर्गत स्वतंत्र भारत @ 75 सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे या संकल्पनेने राज्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव असल्याने शासनाद्वारे निश्चित केलेल्या कोविड नियमांचे पालन करून विविध कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहेत.

शासन निर्देशानुसार सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयामध्ये भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरुवात करण्यात येते. त्यानुसार आज 26 आॅक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय नागपूर येथे तसेच ला.प्र.वि. च्या सर्व घटक कार्यालयात शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय व वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या घटक कार्यालयामार्फत शहरी व ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, प्रशासकीय परिसर इत्यादी ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत
पोस्टर्स/बॅनर्स लावून तसेच विविध कार्यक्रमांद्वारे
जनजागृती करण्यात येत आहे. तसेच, सर्व प्रसारमाध्यमांद्वारे भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात ‘लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे, असे नमुद करून त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाचा पत्ता, फोन नंबर व टोल फ्री नंबर नमुद असलेले फलक/पोस्टर्स लावण्याबाबत सर्व घटक कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत़ भ्रष्टाचार निर्मुलनाच्या कामात तसेच दक्षता जनजागृती सप्ताहामध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग होण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाºया लोकसेवकाविरुद्ध (अधिकारी/कर्मचारी) काही तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्रीय कार्यालय येथे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या उपस्थितीत शपथ कार्यक्रम घेण्यात आला असून, यावेळी कार्यालयातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *