राज्यात ३ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण

पीक शिवार

मुंबई : राज्यातील ३ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण आज पूर्ण झाले आहे. राज्यात काल ४ हजार ५८० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ५ लाख २८ हजार ८५३ नागरिकांचे लसीकरण [ VACCINATION AGAINST CORONA ] पार पडले.

राज्यात कालपर्यंत ९ कोटी ५८ लाख ८ हजार ६२३ मात्रा लाभार्थांना दिल्या असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे. त्यापैकी ६ कोटी ६० लाखांहून अधिक नागरिकांना पहिली मात्रा मिळाली असून ३ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या एकशे दोन कोटी ९६ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यापैकी ३१ कोटी २ लाख नागरिकांना लशींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या असून, इतरांना पहिली मात्रा मिळाली आहे. काल ६४ लाख ७५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयीन सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *