एड्स आणि मलेरियामुळे जगात मृत्यूचे प्रमाण अधिक : डॉ. भारती पवार

राष्ट्रीय

नवी दिल्ली : दक्षिण-पूर्व आशियातील सर्व सहा प्रांतांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, अनेक शतकांपासून मृत्यूंचे ते एक प्रमुख कारण आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार [ UNION MINISTER DR BHARATI PATIL ]  यांनी या संदर्भात मत व्यक्त केले आहे. [ NUMBER OF DEATH CAUSING AIDS AND MALERIA IN SOUTH EAST ASIA ]

सणासुदीसाठी ११० विशेष रेल्वेगाड्यांच्या ६६८ अतिरिक्त फेºया करणार, भारतीय रेल्वेची घोषणा

डॉ. भारती प्रवीण पवार आज क्षयरोग निर्मूलनसंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया प्रांताच्या उच्चस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना बोलत होत्या.

यंदा कडाक्याची थंडी, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक

सध्या एचआयव्ही/एड्स आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रोगांमुळे जगात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यापैकी बहुतेक मृत्यू तरुणांमध्ये होतात, ज्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होतात. एकट्या क्षयरोगाचा आर्थिक भार आयुष्य, पैसा आणि कामाचे वाया गेलेले दिवस याबाबतीत खूप मोठा आहे, असेही मंत्री म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *