चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवरून नेताना ‘हा’ नियम पाळावाच लागणार

राष्ट्रीय

नवी दिल्ली : चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवरून नेण्यासाठी केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुषंगाने मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार चार वर्षांखालील मुलांसाठी दुचाकीचालकाबरोबर मुलाला बांधण्यासाठी सुरक्षा उपकरणांचा वापर करणे बंधनकारक केले आहे.

लहान मुलांना भारतीय मानक विभाग कायदा २०१६ अंतर्गत विहित केलेले हेल्मेट वापरणेही बंधनकारक असेल आहे. दुचाकीचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा जास्त नसावा, अशा सूचनाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *