आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी आज परीक्षा 

राजधानी मुंबई

मुंबई : आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी रविवारी, ३१ ऑक्टोबर २०२१ परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

गट ड संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालयातील ४२ संवर्गातील ७८ कार्यालयातील ३४६२ पदे भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता ४,६१,४९७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त असून,१३६४ केंद्रांवर परीक्षा आयोजन करण्यात आले आहे.

आतापर्यंत ३.६२ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेतले आहे. गट ड संवर्गातील परीक्षा एकाच सत्रात होणार आहे. उमेदवारांनी त्यांना दिलेल्या प्रवेश पत्रानुसार नियोजन करावे. काही शंका असल्यास 9513315535, 7292013550 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन  आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी केले आहे.

परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ अर्चना पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *