नागपूर आकाशवाणीचे संगीत संयोजक शेखर दंडे सेवानिवृत्त

उपराजधानी नागपूर
नागपूर : आकाशवाणी नागपूर केंद्राचे ज्येष्ठ संगीत संयोजक श्री. शेखर विश्वनाथ दंडे २९ ऑक्‍टोबरला २६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
शेखर दंडे यांनी १९९५ साली रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर सर्वप्रथम संगीत संयोजक  म्हणून कार्यभार स्वीकारला. बालगीतापासून भावगीते, भक्तिगीते, गझल, भजन यांसह हजारो गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केलं. २००७ मध्ये सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात “तेव्हा मी नसेन” हा शेखर दंडे यांनी संगीतबद्ध केलेला गाण्यांचा अल्बम खूप गाजला. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर शेकडो गाण्यांचे कार्यक्रम त्यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील आरती अंकलीकर आणि रवींद्र साठे यांच्या आवाजातील सर्वतोमुखी झालेल्या ओव्या शेखर दंडे यांनीच स्वरबद्ध केल्या आहेत.
२३ ऑक्टोबर २००६ रोजी ते नागपूर आकाशवाणीला रुजू झाले. अनेक कार्यक्रमांचे शीर्षकगीत, स्वरमंजिरी कार्यक्रमातील गीतांना कर्णमधुर संगीत देऊन शेखर दंडे यांनी हे कार्यक्रम लोकप्रिय केले. नुकतीच संगीत संयोजक म्हणून त्यांना अ श्रेणी प्राप्त झाली. आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुख सूनलिनी सर्मा आणि संगीत विभाग प्रमुख प्रकाश आत्राम यांनी शेखर दंडे यांचा संगीत प्रवास पुढेही निरंतर सुरू राहावा, यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *